गळा व तोंड फाडून एकाची हत्या, परिसरात खळबळ

Foto

वैजापूर- कापुसवाडगाव शिवारातील शेतवस्तीवर तोंड व गळा फाडुन एकाची हत्या झाल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकिस आली. या.घटनेतील व्यक्तीचा चेहरा पुर्णपणे विद्रूप झाला असुन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिमाशंकर आनंद गिरी (वय ५५) असे मृताचे नाव आहे. मागील काही दिवसांपासुन वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापुसवाडगाव भागात बिबट्याचा वावर असल्याचे नागरिकांनी वनविभागाला कळवले होते. त्यामुळे भिमाशंकर यांना हिंस्त्र प्राण्यानेचे मारुन टाकल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत वनविभागाने स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतरच यावर काही सांगता येईल अशी भुमीका वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.


दरम्यान, बिबट्याच्या अस्तित्वाबाबत वेळोवेळी कळवुनही वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी तत्परता न दाखवल्याने वनविभागाविरुद्ध नागरिकांचा रोष वाढला आहे. हत्या झाल्यानंतर भिमाशंकर यांच्या पत्नीने वन व पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाण्यास विरोध केल्याने शेतवस्तीवर व येथील उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला. वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव शिवारातील गट क्रमांक २४९ मध्ये भिमाशंकर यांची शेतजमीन असुन या ठिकाणी ते एकटेच राहत होते. त्यांची शेती सर्जेराव फकिरा कदम यांना बटाईने दिली आहे. सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कदम हे गिरी यांना बोलावण्यासाठी गेले असता गिरी हे मृत अवस्थेत पडलेले आढळुन आले. त्यांचा चेहरा पुर्णपणे विद्रुप झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक वनरक्षक प्रशांत वरुडे, वनपाल एच.एच. सय्यद, बी.पी.झोड, प्रवीण कोली, वीरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय हरीश बोराडे, अक्रम पठाण, विलास सुखदान, शिवनाथ सरोदे, संतोष सोनवणे, संदिप गायकवाड, बाबासाहेब धनुरे राजेंद्र कासोटे आयबाईक पथकाचे दिनेश गायकवाड, अमोल पहाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करण्यात आला. दरम्यान शेतवस्तीवर पावलांचे ठसे आढळले असले तरी हे ठसे वन्य प्राण्याचे नसल्याचे वनधिकाऱ्यांनी  सांगितले. हत्या नेमकी कशामुळे व कुणी केली याचा खुलासा शवविच्छेदनानंतर पोलिस तपासात उघड होणार असल्याचे सांगत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.अद्याप या घटनेबाबत कुठलाही तपास लागला नसून मांगवारी  सकाळी ८ ३० वाजता औरंगाबादहून श्वान  पथक रवाना झाले होते श्वान पथकाचे एस आय मिसार, हे. कॉ. एस जी तळेकर व श्वान  खुशी हे घटनास्थळी येऊन सकाळी ९ वाजता पाहणी केली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker